Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana | राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेतून घ्या उच्च शिक्षण

Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana: महाराष्ट्र सरकारने राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे आर्थिक मदत मिळते. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकवणी खर्चाची पूर्ण किंवा आंशिक प्रतिपूर्ती मिळू शकते. हे त्यांना उच्च शिक्षण घेण्यास आणि त्यांचे शैक्षणिक मार्ग सुलभ करण्यात मदत करत आहे.
छत्रपती शाहू महाराजांची शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज उच्च शिक्षण संचालनालयाने पदवीपूर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिकवणी खर्चात मदत करण्यासाठी ट्यूशन फी शिष्यवृत्ती योजना 2024 सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीचा उद्देश आर्थिकदृष्ट्या वंचित विभाग (EWS) अंतर्गत येणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे हा आहे. ही योजना निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या शिकवणी आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण परतफेड करते.
राज्याच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार अनेक कल्याणकारी कार्यक्रम राबवत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राज्यातील आर्थिकदृष्ट्या वंचित भागातील विद्यार्थ्यांना मदत करतो.

आजच्या लेखात आपण राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीबद्दल बोलू. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana काय आहे आणि कोण अर्ज करण्यास पात्र आहे? या कार्यक्रमासाठी कोण पात्र आहे? या परिस्थितीत, संपूर्ण माहिती पाहिली जाईल. त्यासाठी हा लेख पूर्ण करण्यासाठी वाचा.

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना म्हणजे काय | What is Rajarshi Shahu Maharaj Scholarship Yojana

महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हा राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti Yojana राजर्षी शाहू योजनेच्या माध्यमातून शालेय परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपये प्रमाणे या योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. (10 महिने- प्रत्येकी 11 वी आणि 12 वी साठी) ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती आणि फेलोशिप व्यतिरिक्त देण्यात येते.

Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti Yojana राज्यातील आर्थिकदृष्ट्या वंचित भागातील विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. परिणामी, या कार्यक्रमाचा उपयोग करून, या श्रेणीतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतील. या कार्यक्रमासह, विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण रकमेच्या 100% प्राप्त होतात. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्जामध्ये अर्जदाराचा निवासाचा पुरावा, मागील वर्षाच्या उत्पन्नाचा पुरावा आणि इतर सहाय्यक कागदपत्रांचा समावेश असणे आवश्यक आहे. यंदाच्या राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती अर्जाची तारीख ३१ मार्च २०२४ होती.

ठळक मुद्दे | Highlights

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना म्हणजे काय
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Details

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना 2024 मराठी माहिती
Rajshree Shahu Maharaj Scholarship 2024 In Marathi

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा उद्देश
Rajshree Shahu Maharaj Scholarship Purpose

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेची थोडक्यात माहिती
Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana In Short

छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचे वैशिष्ट्ये
Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Features

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे फायदे
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Benefits

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठीची पात्रता
Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti Eligibility

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Rajshree Shahu Maharaj Scholarship Documents

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी चे नियम आणि अटी
Chhatrapati Shahu Maharaj Shishyavrutti Terms And Conditions

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
Rajshree Shahu Maharaj Scholarship Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

योजनेची थोडक्यात माहिती | Brief information about the Yojana

योजनेचे नाव

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना

राज्य

महाराष्ट्र

विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

उद्देश

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे

लाभ

प्रति महिना 300 रुपये

लाभार्थी

अकरावी बारावी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी

अर्ज करण्याची प्रक्रिया

ऑनलाइन

अधिकृत वेबसाईट

https://mahadbt.maharashtra.gov.in/

योजनेचा उद्देश | Purpose of the Yojana

• पैसा अभावी कुठल्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
• अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावर अवलंबून राहू राहावे लागू नये म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे.
• उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे.
• विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे हा राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना चा उद्देश आहे.
• राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे.
• Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांची शिक्षणाबद्दलची आवड वाढवणे.

योजनेचे फायदे | Yojana Benefits

• या योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यास मदत होईल
• राज्यातील शिक्षणातील गळती कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरताना दिसत आहे.
• Rajshree Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून मदत करून मागासवर्गीय आणि गरीब घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
• Chhatrapati Shahu Maharaj Scholarship योजनेच्या माध्यमातून राज्यात समानता निर्माण करणे हा सरकारचा उद्देश आहे.
• या योजनेच्या माध्यमातून मदत होत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत होत आहे.
• या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण होईल. याबरोबरच राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यासाठी ही मदत होईल.
• या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभा राहून आत्मनिर्भर होऊ शकतो.
• समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे समान संधी उपलब्ध करून देणे साठी सरकार प्रयत्न करत आहे.
• ही शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थी शिक्षण शुल्काची चिंता न करता शिक्षण पूर्ण करू शकतात.
• या योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण शुल्काची 50 ते 100% परत मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी करण्यास मदत होते त्यांना अधिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येते.

योजनेचे वैशिष्ट्ये | Features of the Yojana

• त्याचा लाभ राज्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होत आहे आणि ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. त्यामुळे राज्यातील साक्षरतेचे प्रमाणही वाढण्यास मदत होत आहे.
• मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि शिक्षणासाठी कोणाकडूनही व्याजाने पैसे घेण्याची गरज राहणार नाही.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप च्या मदतीने या योजनेच्या साठी अर्ज करू शकतो. त्यामुळे त्याला त्याचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.
• Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हा सरकारचा ही योजना सुरू करण्यामागील उद्देश आहे.
• Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी शिष्यवृत्ती थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने जमा होईल.
• राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.

शिक्षण शुल्क | Education Fees

वार्षिक उत्पन्न

सरकारी

खाजगी

अंशतःअनुदानित/विनाअनुदानित

कायम विनाअनुदानित

2,50,000

100%

100%

50%

50%

2,50,000 ते 8 लाख

50%

50%

50%

50%

8,00,000

100%

100%

100%

100%

योजनेसाठीची पात्रता | Eligibility for Yojana

• अर्जदार विद्यार्थ्याला शालेय परीक्षेत 75 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन तो उत्तीर्ण झालेला असावा.
• विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
• अर्जदार विद्यार्थी अकरावी किंवा बारावी वर्गात शिक्षण घेत असलेला असावा.
• अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे

योजनेसाठी चे नियम आणि अटी | Terms and conditions for Yojana

• कुटुंबातील व्यक्तीचे बँक खाते मान्य केले जाणार नाही. याबरोबरच अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे ही गरजेचे आहे.
• Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana योजनेसाठी विद्यार्थी सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शकतो.
• अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित शिष्यवृत्ती प्रदान केल्या नंतर अभ्यासक्रम संबंधित विद्यार्थ्यांनी मध्ये सोडला तर अशा विद्यार्थ्यास प्रदान केलेली शिष्यवृत्तीची रक्कम राज्य सरकारी योग्य वाटल्यास त्याच्याकडून वसूल करते.
• अर्जदार विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा करिता प्रवेश घेतल्यानंतर एखाद्या सेमिस्टर ची परीक्षा दिली नसल्यास किंवा एखाद्या शैक्षणिक वर्षात अनूउत्तीर्ण झाल्याने त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षाकरिता या योजनेअंतर्गत सदर विद्यार्थी लाभ मिळण्यास अपात्र राहील. तथापि पुनश्च त्या वर्षात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अथवा अंशतः उत्तीर्ण झाल्याने ATKT घेतल्यास त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास सदर योजनेतील लाभासाठी पुन्हा पात्र ठरेल. परंतु असे पात्र लाभार्थी अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळ पूर्णतः उत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास संबंधित विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधीसाठी सदर योजनेअंतर्गत लाभाकरता कायमस्वरूपी अपात्र ठरेल.
• मागील वर्षी शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
• लाभार्थी शिक्षण घेत असलेले संस्था शासनात विद्यापीठ शिक्षण मंडळ यांची पूर्व मान्यता व संलग्नता असे संबंधित असले पाहिजे.
• Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana योजनेचा लाभ अर्जदार विद्यार्थ्यांना विद्यार्थी अर्धवेळ किंवा पार्ट टाइम शाळेत प्रवेश घेत असेल तर त्याला मिळणार नाही.
• Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्गातील हजेरी 50% असणे गरजेचे आहे. तरच त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.
• राज्यातील केवळ अनुसूचित जातीतील विद्यार्थी गुणवत्तेच्या आधारे या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
• विद्यार्थ्याकडे स्वतःच्या बँक खाते असणे आवश्यक आहे.
• लाभार्थी विद्यार्थी व संबंधित शिक्षण संस्था यांनी सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सादर केलेला अर्जदार चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती निदर्शनास आल्यास उर्वरित अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी लाभ देण्यात येणार नाही. त्या विद्यार्थ्याला संस्थेला त्यांनी सादर केल्या चुकीच्या माहितीच्या आधारे मिळालेल्या लाभाची संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करण्यात येईल. व कोणत्याही अन्य योजना अंतर्गत संबंधित विद्यार्थ्यास लाभ मिळण्यास प्रतिबंध करण्यात येईल.
• अर्जदार विद्यार्थी चुकीच्या वर्तनामुळे शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर राहणे इत्यादी स्वरूपाचे गैरवर्तन करत असल्याचे संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी निदर्शनास आणले तर अशा विद्यार्थ्यांची शुल्क शिष्यवृत्ती थांबवली किंवा रद्द केली जाऊ शकते.
• जर एखाद्या विद्यार्थ्यास अजारपणामुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे परीक्षा देणे शक्य नसल्यास तसे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थेने शिफारस केल्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागातील उपसंचालक, सहसंचालक व सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.
• अर्जदार विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र व वर्षाची परीक्षा देणे आवश्यक आहे.
• सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना पैकी केवळ एका योजनेचा लाभ मिळाल्यास संबंधित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असू शकतो.
• अर्जदाराने केंद्र किंवा राज्य सरकारचा इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
• एका कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
• तथापि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे | Documents

अर्जदाराचे आधार कार्ड Aadhar Card

रहिवासी प्रमाणपत्र Resident Certificate

दहावी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका 10th pass mark sheet

मोबाईल नंबर Mobile Number

ईमेल आयडी Email ID

पासबुक फोटो Passport Photo

जातीचे प्रमाणपत्र Caste Certificate

शाळा सोडल्याचा दाखला School Leaving Certificate

अकरावीत प्रवेश घेतल्याची पावती 11th Admission Receipt

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया | Procedure for Applying for the Yojana

Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम विद्यार्थ्याने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.

त्यानंतर त्याच्यासमोर योजनेचे होमपेज उघडेल त्यावर असलेला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी

संपूर्ण माहिती भरून झाल्यावर एकदा तपासून घ्यावी माहिती तपासून घेतल्यानंतर रजिस्टर या पर्याय वर क्लिक करावे

अशा सोप्या पद्धतीने नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल

टप्पा दुसरा-

अर्जदाराला आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून पुन्हा लॉगिन करावे लागेल

टप्पा तिसरा-

अर्जदाराला होमपेज वर जाऊन पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती या पर्यायावर क्लिक करावे लागेल

त्यानंतर social justice and special assistance Department या पर्यावर क्लिक करावे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज मिरीट स्कॉलरशिप हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे

आता तुमच्यासमोर या शिष्यवृत्तीची संपूर्ण माहिती उघडेल ती वाचून खाली Apply For This Scheme या पर्यावर क्लिक करावे

यानंतर तुमच्यासमोर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल

अर्ज उघडल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी

माहिती भरून झाल्यावर विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करून रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे

अशा प्रकारे तुमची या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ’s

प्रश्न: राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजने अंतर्गत किती रुपये शिष्यवृत्ती देते?
उत्तर: अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दरमहा तीनशे रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.

प्रश्न: राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश काय?
उत्तर: मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रश्न: ही योजना कोणत्या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे?
उत्तर: या योजनेसाठी केंद्रीय कृत प्रवेश प्रक्रिये द्वारे निवडक व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

प्रश्न: राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजनेची स्थिती कशी कळेल?
उत्तर: विद्यार्थी महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात.

प्रश्न: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर: Rajshree Shahu Maharaj Scholarship Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

प्रश्न: राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे?
उत्तर: या योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना घेता येतो.

प्रश्न: राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप अंतर्गत किती रुपयाची आर्थिक मदत केली जाते?
उत्तर: या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% शिष्यवृत्ती दिली जाते.

प्रश्न: अर्ज करताना काही अडचणी येत असल्यास काय करावे?
उत्तर: विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरील हेल्प डेट शी संपर्क साधून किंवा उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना मदत मिळेल.

प्रश्न: या योजनेची अधिक माहिती कुठे मिळेल?
उत्तर: सरकारच्या महाडीबीटी पोर्टल ला भेट दिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल किंवा उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधूनही तुम्ही या योजनेची माहिती घेऊ शकता.