कृषी यांत्रिकीकरण योजना | Krushi Yantrikikaran Yojana

Krushi Yantrikikaran Yojana राष्ट्रीय आणि राज्य सरकारे देशाच्या शेतकरी समुदायाच्या वाढीला पाठिंबा देण्यासाठी अनेक योजना कृतीत आणत आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू केली. याद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीवर ८०% पर्यंत अनुदान देण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

Krushi Yantrikikaran Yojana शेतकरी या व्यवस्थेचा लाभ घेऊन सवलतीच्या दरात कृषी अवजारे खरेदी करू शकतात. आता या प्रोग्रामसाठी अर्ज कसा करायचा ते पाहू या. ही योजना कोणासाठी खुली आहे? याबद्दल सर्व माहिती.

Krushi Yantrikikaran Yojana भारत हे शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले राष्ट्र आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. अनेक शेतकरी दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असल्याने आणि त्यांचे उत्पन्न मध्यम असल्याने त्यांना शेतीची अवजारे परवडत नाहीत. प्रतिकूल आर्थिक वातावरणामुळे अनेक शेतकरी ऊन, वारा आणि पाऊस असूनही पारंपारिक शेती करत आहेत. कारण शेतीसाठी अधिक वेळ आणि मेहनत आवश्यक आहे, राज्याच्या सर्व शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्रात अधिक अत्याधुनिक यंत्रे वापरणे आवश्यक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकरी घेऊ शकतात.

Krushi Yantrikikaran Yojana महाराष्ट्रातील शेतकरी शेतीची साधने खरेदी करू शकतील यासाठी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत आहेत. या शेतकऱ्यांना अशी अवजारे खरेदी करता यावीत यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी अवजारे खरेदीसाठी 80 टक्के अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. या व्यवस्थेचा लाभ घेणारे शेतकरी आवश्यक अवजारे खरेदी करू शकतात. सरकार त्याला 80 टक्क्यांपर्यंत सबसिडी देत ​​आहे.

शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री शेतीसाठी वापरण्यास प्रोत्साहित करणे हे कृषी यांत्रिकीकरण योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचून आणि त्यांना कमी प्रयत्न करावे लागतील आणि त्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल.

ठळक मुद्दे | Highlights

कृषी यांत्रिकीकरण योजनेची थोडक्यात माहिती
Krushi Yantrikikaran Yojana In Short

कृषी यांत्रिकीकरण योजनेची वैशिष्ट्ये
Krushi Yantrikikaran Yojana 2024 Features

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आरक्षण
Maharashtra Krishi Yantrikikaran Yojana

आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत दिलेले जाणारे अनुदान
Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिकीकरण योजनेची पात्रता
Krushi Yantrikikaran Yojana Eligibility

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठीची कागदपत्रे
Krushi Yantrikikaran Yojana Documents

कृषी यांत्रिक करण्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
Krushi Yantrikikaran Yojana Online Apply

कृषी यांत्रिकीकरण योजना मराठी माहिती
Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश
Purpose Of Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत समाविष्ट अवजारे
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत टक्केवारी अनुसार दिले जाणारे अनुदान
Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध औजारांसाठी दिली जाणारी अनुदान राशी
इतर लाभार्थी यांना 40 टक्के
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान
Subsidy For Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra In Marathi

कृषी यांत्रिकीकरण योजनेचे लाभ
Krushi Yantrikikaran Yojana Benefits

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अटी आणि शर्ती
Krushi Yantrikikaran Yojana Terms And Conditions

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड प्रक्रिया
Krushi Yantrikikaran Yojana 2024 In Marathi

कृषी यांत्रिकेसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Krushi Yantrikikaran Yojana Application

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

योजनेची थोडक्यात माहिती | Krushi Yantrikikaran Yojana In Short

योजनेचे नाव

कृषी यांत्रिकीकरण योजना

विभाग

महाराष्ट्र कृषी विभाग

उद्देश काय

शेती क्षेत्रात आधुनिक यंत्राचा वापर वाढवणे

लाभ काय

शेतीसाठी लागणाऱ्या अवजार खरेदीसाठी 80 टक्के अनुदान

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन आणि ऑनलाईन

योजनेचा उद्देश | Purpose Yojana

• शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
• आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीची कामे जलद करणे जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि शेतीची कामे वेळेवर होती.
• शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे.
• शेतीसाठी लागणारे आधुनिक यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा मुख्य उद्देश कृषी यांत्रिकीकरण योजनेचा आहे.
• आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी मदत करणे. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
• कृषी यांत्रिकीकरणाला Krushi Yantrikikaran Yojana Maharashtraया योजनेच्या माध्यमातून प्राधान्य देणे.
• शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये आणि कोणाकडून पैसे उधार घ्यावे लागू नयेत यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना काम करत आहे.

योजनेची वैशिष्ट्ये | Yojana Features

• शेतकरी या योजनेच्या माध्यमातून अवजारे खरेदी करून शेतीची कामे कमी वेळात करू शकतील यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
• महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने ठेवली आहे जेणेकरून शेतकऱ्याला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागू नये.
• महाराष्ट्र सरकारची कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत एक योजना आहे या मध्ये केंद्र सरकारचा 60% सहभाग तर राज्य सरकारचा 40% सहभाग आहे.
• शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यामुळे शेतकऱ्याला घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने अर्ज करता येतो. अर्ज करायला मोबाईलवर करता येत असल्यामुळे शेतकऱ्याला कुठल्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा या दोघांचीही बचत होती.
• शेतकऱ्याची कामे तंत्रज्ञानाच्या आधारे जलद गतीने व्हावी हा सरकारचा ही योजना सुरू करण्यामागील उद्देश आहे.
• Krushi Yantrikikaran Yojana Maharashtraया योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते.
• Krushi Yantrikikaran Yojana Maharashtraया योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी अनुदान रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या मदतीने जमा केली जाईल.
• महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
• Krushi Yojana या योजनेच्या माध्यमातून अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहीत धरण्यात येत नाही.
• अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मीळेपर्यंत अर्जाची स्थिती एसएमएसच्या माध्यमातून प्राप्त करू शकतात.

योजनेअंतर्गत समाविष्ट अवजारे

1. काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे : मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर
2. ट्रॅक्टर चलीत औजारे : रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र,
3. स्वयंचलित औजारे : रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)
4. मळणी यंत्र (थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत टक्केवारी अनुसार दिले जाणारे अनुदान

अल्प व अत्यल्प भुधारक, अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी

50 टक्के अनुदान

इतर शेतकरी

40 टक्के अनुदान

मात्र राईस मिल, दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशरच्या बाबतीत अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा

60 टक्के अनुदान

इतर लाभार्थी

50 टक्के अनुदान

शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी

60 टक्के अनुदान (24 लाख रु. पर्यंत अनुदान)

योजनेअंतर्गत आरक्षण | Maharashtra Krishi Yantrikikaran Yojana

महिलांसाठी : 30 टक्के निधी
दिव्यांग व्यक्तीसाठी : 3 टक्के निधी
जर महिला व दिव्यांगांसाठी अर्ज आले नाहीत तर सदर निधी इतर शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येईल
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध औजारांसाठी दिली जाणारी अनुदान राशी
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)

ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी)

1.25 लाख रुपये  

पॉवर टिलर    बीएचपी पेक्षा कमी    

65,000/- रुपये  

बीएचपी व त्यापेक्षा जास्त

85,000/- रुपये

स्वयंचलित अवजारे रिपर कम बाइन्डर (3 व्हील)

1,75,000/- रुपये  

रिपर कम बाइन्डर (4 व्हील)

2,50000/- रुपये

रीपर

75,000/- रुपये

पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड)

25,000/- रुपये  

पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड)

35,000/- रुपये

पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड)

63,000/- रुपये  

ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे 

 

रोटाव्हेटर 5 फुट

42,000/- रुपये

रोटाव्हेटर 6 फुट

44,800/- रुपये

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)

1 लाख रुपये  

थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)

2.50 लाख रुपये  

पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त)

20,000/- रुपये  

रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)

35,000/- रुपये  

कल्टीव्हेटर

50,000/- रुपये

पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम

70,000/- रुपये

पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम

89,500/- रुपये

पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम

4,000/- रुपये

नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम

50,000/- रुपये

ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)

1.25 लाख रुपये  

विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर

75,000/- रुपये  

कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर

1 लाख रुपये  

Manually operated chaff cutter (above 3 feet)

6,300/- रुपये  

Manually operated chaff cutter (upto 3 feet)

5000/- रुपये

इतर लाभार्थी यांना 40 टक्के | 40% Other Beneficiaries

ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) 1 लाख रुपये
पॉवर टिलर 8 बीएच पी पेक्षा कमी 50,000/- रुपये
8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त 70,000/- रुपये
स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) 1.40 लाख रुपये
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) 2 लाख रुपये
रीपर 60,000/- रुपये
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड) 20,000/- रुपये
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) 30,000/- रुपये
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) 50,000/- रुपये
ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलितअवजारे
रोटाव्हेटर 5 फुट 34,000/- रुपये
रोटाव्हेटर 6 फुट 35,800/- रुपये
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) 80,000/- रुपये
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) 2 लाख रुपये
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) 16,000/- रुपये
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र) 30,000/- रुपये
कल्टीव्हेटर 40,000/- रुपये
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम 56,000/- रुपये
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम 71,600/- रुपये
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम 32,000/- रुपये
पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम 40,000/- रुपये
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर 1 लाख रुपये
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर 60,000/- रुपये
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर 80,000/- रुपये
Manually Operated Chaff Cutter (Above 3 Feet) 40 टक्के 5000/- रुपये
Manually Operated Chaff Cutter (Upto 3 Feet) 40 टक्के 4000/- रुपये

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा

मिनी दाल मिल

60 टक्के 1.5 लाख रुपये

मिनी राईस मिल

60 टक्के 2.4 लाख रुपये

पैकिंग मशीन

60 टक्के 3 लाख रुपये

सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर      

60 टक्के 60,000/- लाख रुपये

सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर

50 टक्के 1 लाख रुपये

इतर लाभार्थी  

 

मिनी दाल मिल

50 टक्के 1.25 लाख रुपये

मिनी राईस मिल

50 टक्के 2 लाख रुपये

पैकिंग मशीन

50 टक्के 2.40 लाख रुपये

सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर

50 टक्के 50,000/- रुपये

सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर

40 टक्के 80000/- रुपये

योजनेचे लाभ | Benefits of the Scheme

• राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
• महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
• Krushi Yantrikikaran Yojana Maharashtraया योजनेच्या माध्यमातून विविध जबाबदारी खरेदीसाठी अनुदान मिळवून दिले जाते.
• महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदीसाठी आर्थिक मदत करण्यात येते.
• शेतकऱ्यांना शेती उपकरणे साहित्य खरेदीसाठी आर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये आणि या योजनेमुळे त्यांना सहज सहज उपकरणे खरेदी करता येतील.
• शेतकऱ्यांना शेती क्षेत्राशी संबंधित आधुनिक अवजारे खरेदीसाठी सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे.
• आधुनिक अवजारे खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येतात त्यामुळे शेतीच्या उत्पन्न वाढीस मदत होईल

योजनेची पात्रता | Yojana Eligibility

अर्जदार व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा त्याला लाभ दिला जातो.

योजनेच्या अटी आणि शर्ती | Yojana Terms And Conditions

• अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे म्हणजे त्याच्याकडे शेती असणे आवश्यक आहे.
• शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्यास त्याच्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
• कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8अ असणे गरजेचे आहे.
• संबंधित अवजाराच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने ट्रॅक्टरचा लाभ मिळवला असेल तर ट्रॅक्टरचलित आजारासाठी लाभ मिळण्यास अर्जदार पात्र असेल मात्र त्याला ट्रॅक्टर असल्याचा पुरावा अर्जासोबत जोडावा लागेल.
• केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो महाराष्ट्र बाहेरील व्यक्तीचा अर्ज रद्द केला जाईल.
• अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
• या योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेली शेतीची अवजारे शेतकऱ्याला किमान 6 वर्ष हस्तांतर पुनर्विक्री किंवा गहाण ठेवता येणार नाहीत.
• अर्जदारास ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजारे यापैकी केवळ एकाच गोष्टीसाठी अनुदान देण्यात येईल.
• एखाद्या शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून अवजार खरेदीचा लाभ घेतला असेल तर पुढील 10 वर्ष त्याला या योजनेचा लाभ पुन्हा घेता येणार नाही. मात्र दुसऱ्या अवजारासाठी तो शेतकरी अर्ज करू शकतो आणि योजनेचा लाभ घेऊ शकतो.

योजनेसाठीची कागदपत्रे | Yojana Documents

आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
रेशन कार्ड
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
जातीचे प्रमाणपत्र
जमिनीचा 7/12 आणि 8 अ
बँक खाते पासबुक
यंत्र किंवा अवजाराचे कोटेशन
परीक्षण अहवाल प्रमाणपत्र
प्रतिज्ञापत्र
पासपोर्ट साईज फोटो

योजनेचा ऑनलाईन प्रक्रिया | Yojana Online Apply

अर्ज करण्यासाठी प्रथम अर्जदाराला कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर कृषी विभागात कृषी यांत्रिकीकरण योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज उघडेल त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून भरावी.
त्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावीत.
संपूर्ण माहिती भरून झाल्यावर एकदा अर्ज तपासून पहावा माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर सेव या बटनावर क्लिक करावे.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया | Yojana offline Application

शेतकऱ्यांना सर्वात प्रथम जिल्ह्याच्या कृषी विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. त्यानंतर अर्ज विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्याच्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर त्याच कार्यालयात तुम्ही भरून दिला अर्ज जमा करावा लागेल. अशा सोप्या पद्धतीने या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करता येतो.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: कृषी यांत्रिकी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आणि संबंधित जिल्हा कृषी विभागात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

प्रश्न: कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून किती अनुदान मिळते?
उत्तर: या योजनेच्या माध्यमातून 80 टक्के अनुदान शेतीचे अवजारे खरेदी करण्यासाठी दिले जाते.

प्रश्न: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश काय?
उत्तर: राज्यातील कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतीतील कामे जलद गतीने आणि वेळेवर पूर्ण करणे हा आहे.

प्रश्न: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ काय?
उत्तर: या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते.